ठाणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राबोडी येथे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करत असतांना सुहास देसाई त्याठिकाणी आले. ‘त्यांनी कारवाई रोखून कर्मचार्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली’, असे महानगरपालिकेच्या कर्मचार्याने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे सुहास देसाई यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.