मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचे कुटुंबच भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, याचे हे उदाहरण !
थिरूवनंतपूरम् – केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची कन्या वीणा विजयन् यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केरळमधील राजकीय वातावरण बरेच तापले आहे. वीणा विजयन् आणि त्यांचे आस्थापन यांनी कोणतेही काम न करता त्यांना प्रतिमहा ८ लाख रुपये मिळत असल्याचे प्राप्तीकर तपासणीत समोर आले आहे. वीणा आणि त्यांचे आस्थापन यांच्यावर ३ वर्षे कोणतेही काम न करता खाजगी आस्थापनाकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार वीणा विजयन् आणि त्यांची कंपनी यांना ‘कोची मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड’ नावाच्या कंपनीकडून तीन वर्षांसाठी प्रत्येक मासाला ८ लाख रुपये दिले जात होते. वीणा विजयन् यांचे पती महंमद रियाझ हे पिनराई विजयन् यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.