पंजाब गोरक्षा दलाच्या गोरक्षकांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी केली कारवाई !
जालंधर (पंजाब) – येथील नेहा टोका नावाच्या एका बंद पडलेल्या कारखान्यामध्ये गोमांस छोट्या पाकिटांमध्ये भरत होते. पंजाब गोरक्षा दल या संघटनेला याविषयीची माहिती मिळताच तिने पंजाब पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्व १३ जणांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक व्यक्ती बिहार येथील असून अन्य सर्वजण हे रोहिंग्या मुसलमान असल्याचे समोर आले.
जालंधर – गौ मांस के साथ 12 रोहिंग्या सहित 13 गिरफ्तार
बंद पड़ी फैक्ट्री को किराये पर लेकर दिल्ली का एक मास विक्रेता मुस्लिम व्यापारी इमरान यहां पर गैर कानूनी तरीके से गौ मांस की पैकिंग करवा रहा था
यहां पर गौ मांस को पैक कर के विदेशों में #Punjab #cowslaughter #Rohingya pic.twitter.com/1zHbVBMKLj
— A🕉 (@kofmajhab1) August 7, 2023
१. देहली येथील इम्रान नावाची व्यक्ती अनधिकृतपणे जालंधरमध्ये गोमांस पाठवीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
२. पंजाब गोरक्षा दलाने याआधी राज्यातील राजपुरा येथेही अशा प्रकारे चालू असलेला गोमांस विक्रीचा अनधिकृत व्यवसाय समोर आणला होता. ‘पांचजन्य’ या हिंदुत्वनिष्ठ नियतकालिकाच्या संकेतस्थळावरून ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे.
३. पंजाब गोरक्षा दलाचे सतीश प्रधान यांनी माहिती दिली की, त्यांचे कार्यकर्ते या कारखान्याजवळ पोचताच तेथील चौकीदार पळून गेला. पोलीस छापेमारी करण्यासाठी येत असल्याची सूचना मिळाल्याने काही लोक आधीच फरार झाले.
संपादकीय भूमिका
|