राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

  • राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनाचा अवमान केल्याचे प्रकरण

  • सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यामागील कारण स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – मोदी आडनावाचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यामुळे त्यांचे संसदेतील सदस्यत्व रहित झाले. शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एखाद्याचा अवमान केल्याप्रकरणी अधिकाधिक २ वर्षांची शिक्षा होते. राहुल गांधी यांनी केलेले अवमानकारक वक्तव्य हा जामीनपात्र गुन्हा आहे. गांधी यांना दोन वर्षांपेक्षा एक दिवस अल्पही शिक्षा असली असती, तरी कायद्यानुसार त्यांचे संसदेतील सदस्यत्व रहित झाले नसते. त्यामुळे सुरत न्यायालयाने गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देण्यामागे नेमके काय कारण होते? , हे स्पष्ट करायला हवे होते. गांधी यांचे वक्तव्य अयोग्य होते. सार्वजनिक जीवनात राहुल गांधी यांच्याकडून अधिक दायित्वाने वागण्याची अपेक्षा केली जाते.

न्यायालयाच्या निकालावर काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये उर्दू शब्दांचा भडीमार !

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानणार्‍या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसकडून आणखी कोणती अपेक्षा करावी ?

न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट केले, ‘‘हा द्वेषाच्या विरोधातील प्रेमाचा विजय आहे. सत्यमेव जयते !’’ यातही काँग्रेसने ‘मोहब्बत’, ‘नफरत’, ‘जीत’ अशा प्रकारच्या उर्दू शब्दांचा वापर केला आहे.