मोहरमच्‍या मिरवणुकीत पोलीस अधिकार्‍यांचा धर्मांधाच्‍या खांद्यावर बसून नाच !

आमदार नीतेश राणे यांची विधानसभेत माहिती देऊन कारवाईची मागणी !

आमदार नीतेश राणे

मुंबई, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – अहिल्‍यादेवी होळकर नगर येथे साहाय्‍यक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी मोहरमच्‍या मिरवणुकीत गुन्‍हेगार रशीद अब्‍दुल दांडा याच्‍या खांद्यांवर बसून नाच केला, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत केला. माहितीच्‍या सूत्राच्‍या अंतर्गत ही माहिती राणे यांनी सभागृहात दिली. याविषयीचा व्‍हिडिओही उपलब्‍ध असल्‍याची माहिती नीतेश राणे यांनी देऊन पोलीस अधिकारी गजेंद्र इंगळे यांना निलंबित करण्‍याची मागणी केली.