पुणे – ‘डी.आर्.डी.ओ.’चे येथील संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांनी आपल्या भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला असल्याची माहिती अन्वेषणातून लक्षात आली आहे. पुसलेल्या ‘डेटा’मध्ये भारतीय लष्करासंदर्भात, तसेच पाकिस्तानी तरुणी झाराशी केलेल्या चर्चांचे संवाद असण्याची शक्यता आहे. ‘डेटा’ परत मिळवण्याचे काम चालू आहे. गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) भ्रमणभाष पडताळणीसाठी पाठवण्यात आला आहे.
ए.टी.एस्.ने कुरूलकरांची ‘व्हाईस लेअर टेस्ट’ करण्याची अनुमती मागितली होती. कुरूलकर यांच्या आवाजाच्या चाचणीवर म्हणजेच ‘व्हॉईस लेअर सायकॉलाॉजिकल अॅनलिसिस’वर ९ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने ए.टी.एस्.ला कुरूलकरांची ‘व्हॉईस लेअर टेस्ट’ करण्यास अनुमती दिली, तर महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. सध्या कुरूलकर हे ए.टी.एस्.च्या कह्यात आहेत.