हुतात्‍मा राजगुरु स्‍मारकाच्‍या विकास आराखड्याला जिल्‍हास्‍तरीय समितीची संमती !

चंद्रकांत पाटील

पुणे – राजगुरुनगर येथील हुतात्‍मा शिवराम हरि राजगुरु स्‍मारकाच्‍या विकास आराखड्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय समितीने संमती दिली आहे. हा आराखडा मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखालील उच्‍चाधिकार समितीच्‍या संमतीसाठी सांस्‍कृतिक कार्य विभागालाही सादर करण्‍यात येणार आहे. या वेळी वास्‍तूविशारदांनी स्‍मारकाच्‍या अनुषंगाने सिद्ध केलेल्‍या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. स्‍मारकाच्‍या आराखड्याचे टप्‍पे करून मुख्‍य भागाच्‍या विकासावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्‍या. पहिला टप्‍पा पुरातत्‍व विभाग विकसित करणार असून यासाठी ९४ कोटी ९९ लाख रुपये खर्चाचा आराखडा समाविष्‍ट आहे, तर दुसरा आणि तिसरा टप्‍पा सार्वजनिक बांधकाम विभाग विकसित करणारा असून त्‍यासाठी १६९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचा आहे.