बोअरवेलमध्‍ये गांजा लपवल्‍याने २ जणांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मंगळवेढा (जिल्‍हा सोलापूर) – लक्ष्मी दहीवडी परिसरात एका उपाहारगृहाजवळ असलेल्‍या बोअरवेलमध्‍ये १ लाख रुपये किमतीचा १ किलो ३८ ग्रॅम गांजा लपवून ठेवण्‍यात आला होता. या प्रकरणी असीफ अबूबकर तांबोळी आणि सिद्धेश्‍वर बनसोडे यांना अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांना न्‍यायालयात उपस्‍थित केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.