आपल्या हृदयात धर्म स्थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्थापन होईल, तेव्हा वैराग्य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्का) होईल, तितकीच वैराग्याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल, तितकीच विषय भोगण्याची रुची राहील. मी कोणत्या वस्तूचा उपभोग घेत आहे किंवा काय करत आहे ? वासना मनुष्याला आंधळे करते. वासना आंधळे करील त्यापूर्वीच ज्ञानाचे नेत्र उघडावे. मृत्यू मारून टाकेल त्यापूर्वीच अमरतेचा रस प्यावा. कुटुंबीय घरातून तिरडीवर बाहेर काढतील, त्यापूर्वीच आपण आपल्या मनाला कुटुंबातून बाहेर काढून परमात्म्यात लावावे.
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २४, अंक १)