‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने साधनेला योग्‍य दिशा मिळाली’, असा भाव असलेले जळगाव येथील श्री. संकेत अरुण सोनार !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी गुरुकृपेची आवश्‍यकता असते’, असे लक्षात येणे

‘मला लहानपणापासून प्रभुदयेने त्‍याच्‍या भक्‍तीची आवड होती. ‘माझी आध्‍यात्‍मिक उन्‍नती व्‍हावी’, अशी इच्‍छा होती. मी जसजसा मोठा होऊ लागलो, तसतशी एक गोष्‍ट माझ्‍या लक्षात येऊ लागली, ‘आध्‍यात्‍मिक उन्‍नती होण्‍यासाठी भगवंताच्‍या आशीर्वादासह गुरूंची, गुरुभक्‍ती करण्‍याची आणि गुरुकृपेची आवश्‍यकता असते.’ त्‍या दृष्‍टीने माझ्‍या मनात अनंत प्रश्‍न निर्माण झाले होते.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्‍संग

श्री. संकेत सोनार

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘शिबिरा’त मला सहभागी होण्‍याची संधी लाभली. त्‍या वेळी प्रभुकृपेमुळे मला गुरुदेवांचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) सत्‍संग लाभला.

२ अ. गुरुदेवांच्‍या कृपेने योग्‍य दिशा मिळणे : त्‍यामुळे मला एकाग्रता, स्‍थिरता, निर्मळता, प्रीती आणि भाव इत्‍यादी गोष्‍टी अनुभवता आल्‍या. गुरुदेवांच्‍या कृपेने माझ्‍या मनात एकही शंका किंवा प्रश्‍न शेष न रहाता माझ्‍या साधनेला योग्‍य दिशा मिळाली.

२ आ. साधनामार्गावर निरंतर वाटचाल करण्‍याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळणे : माझे आई-वडील, भाऊ आणि मी रहातो, ते स्‍थान, तेथील वातावरण, मी काम करतो ते स्‍थान संपूर्ण भक्‍तीमय झाले आहे. मला या साधनामार्गावर निरंतर आणि चिरकालपर्यंत वाटचाल करण्‍याची अन् सतत कार्यरत रहाण्‍याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘गुरुदेवांची अनंत कृपा, मार्गदर्शन आणि ज्ञान यांमुळे माझ्‍या रोमारोमांत प्रेम, भाव अन् भक्‍ती जागृत झाली आहे’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांची अशीच कृपा आमच्‍यावर असावी’, अशी त्‍यांच्‍याचरणी प्रार्थना !’

– श्री. संकेत अरुण सोनार, जळगाव (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक