सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानंतर रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या चंडीयागाच्‍या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात १४.५ आणि १५.५.२०२३ या दिवशी ‘चंडीयाग’ झाला. त्‍या वेळी प.पू. गुरुदेव उपस्‍थित होते. त्‍यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी ‘या यज्ञाच्‍या माध्‍यमातून देवीचे मारक तत्त्व प्रगट होऊन हिंदु राष्‍ट्र-निर्मितीच्‍या कार्यास अन् संकल्‍पास गती मिळणार आहे’, असे मला वाटले.

श्री. राजेंद्र सांभारे

२. ‘चंडीदेवी आणि दुर्गादेवी, म्‍हणजे अनुक्रमे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी माध्‍यम बनून हे कार्य करणार आहेत आणि हिंदु राष्‍ट्र येणार आहे’, असे मला जाणवले.

३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर माझी भावजागृती होऊन मला आनंद झाला.

गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. राजेंद्र नारायण सांभारे (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वय ६४ वर्षे), शाहूपुरी, सातारा. (१६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक