‘प्रत्‍येक क्षणाचा सेवेसाठी वापर कसा करावा ?’, हे कृतीतून शिकवणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा मी एका साधिकेसमवेत साधनेविषयी चर्चा करत होतो. तेव्‍हा मी तिला म्‍हणालो, ‘‘तू पुष्‍कळ भाग्‍यवान आहेस. तुला साक्षात् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या समवेत सेवा करायला मिळते. तुला त्‍यांच्‍याकडून काय शिकायला मिळाले ?’’ तेव्‍हा तिने मला सांगितले, ‘‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ नेहमी म्‍हणतात, ‘‘वेळ अतिशय महत्त्वाचा आहे.’’ एकदा रामनाथी आश्रमात यज्ञ चालू होता. तेव्‍हा पूर्णाहुती झाल्‍यावर आरती होण्‍यापूर्वी १० मिनिटे वेळ होता. त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘मला या १० मिनिटांत ३ जणांना भ्रमणभाष लावून दे.’’ त्‍या एकेका क्षणाचा विचार करतात आणि त्‍यातही ‘सेवा कशी होईल ?’, हेे पहातात.’’

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

हे ऐकल्‍यावर मला स्‍वतःची लाज वाटली. मी कितीतरी वेळ भ्रमणभाषवर वाया घालवतो. यानंतर हा प्रसंग आठवल्‍यावर माझे मनावरचे नियंत्रण आपोआप वाढते आणि मी सतर्क होतो.’

– श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्‍यांचे समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती. (२२.२.२०२१)