उडुपी (कर्नाटक) येथील ३ धर्मांध विद्यार्थिनींचे कुकृत्य !
उडुपी (कर्नाटक) – कर्नाटकातील अंबलपाडी बायपास येथील नेत्र ज्योती या खासगी महाविद्यालयामध्ये ३ मुसलमान विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात कॅमेरा लावल्याचे निष्पन्न झाले आहे. याद्वारे त्यांनी हिंदु विद्यार्थिनींची छायाचित्रे काढून ती मुसलमान मुलांमध्ये प्रसारित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी काढलेली काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे घृणास्पद कृत्य या ३ विद्यार्थिनी करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर या ३ विद्यार्थिनींसह अन्य विद्यार्थ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्या वेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी यात हस्तक्षेप केला आणि विद्यार्थ्यांना शांत केले. यानंतर या ३ विद्यार्थिनींना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांनी या ३ जणींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Karnataka: Three girl students suspended for placing a mobile camera in the bathroom of a nursing home in Udupihttps://t.co/qAYnO1fR3L
— OpIndia.com (@OpIndia_com) July 22, 2023
१. या ३ विद्यार्थिनींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या संघटनांनी पोलीस अधीक्षक अक्षय हाके यांच्याकडे केली आहे.
२. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थिनींना निलंबित केले; मात्र त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाकेवळ धर्मांध तरुणच नव्हे, तर तरुणीही हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची संधी शोधत असतात, हेच वारंवार दिसून आले आहे. सर्वधर्मसमभाववाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? |