सर्वांवर कृपादृष्टी असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील रामनाथ मंदिराच्या विद्याधिराज सभागृहात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला.
त्या कालावधीत या भागात पाऊस पडला नाही. २३.६.२०२३ या दिवसापासून पावसाचे आगमन झाले. हे एक आश्चर्यच होय. ‘देश-विदेशांतून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना महोत्सवात सहभागी होतांना त्रास होऊ नये’, यासाठी महोत्सवाच्या कालावधीत पाऊस पडला नाही. महोत्सवात सहभागी होणार्या कुणालाही थोडासाही त्रास झाला नाही. ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांची कृपा आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रणाम !’
– सौ. सुनीती आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधु ज्ञानयोगी अनंत आठवले यांच्या पत्नी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वहिनी), ढवळी, गोवा. (३०.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |