मणीपूरच्या घटनेमुळे संददेत गदारोळ

नवी देहली – मणीपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज काही वेळ स्थगित करण्यात आले होते.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मणीपूरच्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती. सरकारने या वेळी सांगितले की, या घटनेविषयी संसदेत चर्चा करण्यास आम्ही सिद्ध आहोत.