सुभाषित रत्ने

दैवं पुरुषकारेण यो निवर्तितुमिच्छति ।
इह वाऽमुत्र जगति स सम्पूर्णाभिवाञ्छितः ।।

(संदर्भ : योगवासिष्ठ, प्रकरण २, सर्ग ७, श्लोक २ )

अर्थ : ‘जो पुरुष आपल्या पौरुषाने (पुरुषार्थाने) दैवाला (भाग्य) जिंकण्याची इच्छा करतो, त्याचे इहलोक आणि परलोक येथील मनोरथ पूर्ण होतात.’

ये समुद्योगमुत्सृज्य स्थिता दैवपरायणाः ।
ते धर्ममर्थं कामं च नाशयन्त्यात्मविद्विषः ।।

(संदर्भ : योगवासिष्ठ, प्रकरण २, सर्ग ७, श्लोक ३)

अर्थ : ‘जे लोक उद्यमाचा परित्याग करून दैवावर विसंबून (निर्भर) रहातात, ते आत्मशत्रू (आपल्या आत्म्याचे शत्रू) होत. ते अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष यांचा विनाश करतात.’

(संदर्भ : श्री योगवासिष्ठ महारामायण, मुमुक्षू-व्यवहार प्रकरण  ७, सर्ग २, श्लोक ३)