१९ ते २२ जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

पुणे – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने १७ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला, तर १८ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे.