नवी देहली – देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकात पावसामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये १५४ रस्ते बंद करण्यात आले आहेत. आसाममधील ६ जिल्ह्यांतील १२१ गावांतील अनुमाने २२ सहस्र लोकांना पुराचा फटका बसला आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर छिन्काजवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. साधारण ५ घंट्यांनंतर तो चालू करण्यात आला.
मॉनसून की शुरुआत, हिंदुस्तान पर जल प्रहार!#heavyrainfall #WeatherUpdate | #SayeedAnsari pic.twitter.com/ZHP8b6duwE
— AajTak (@aajtak) July 8, 2023
( सौजन्य : AajTak )
पुढील ४ ते ५ दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह ९ जुलैपर्यंत जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.