१. ‘गाभार्यातील देवाची मूर्ती फुलांच्या माळेविना अपूर्ण असते, तसे गुरु आणि देव यांच्याविषयीचे बोलणेही कृतज्ञतारूपी पुष्पमाळेशिवाय अपूर्ण आहे !
२. नैतिकतेत नम्रतेचा वास असतो. ज्या वेळी नम्रता कृतज्ञतेच्या भावात देवतेच्या चरणी समर्पित होऊ लागते, त्या वेळी मनोलयाला प्रारंभ होतो. कृतज्ञतेचा भाव जिवाला देवत्व प्रदान करतो.