श्रीकृष्ण आणि श्री गुरु यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे साधिकेला आलेल्या अनुभूती 

१. गुरुपौर्णिमेच्या वेळी ‘सर्वच गुरूंना समर्पित केले आहे’ या भावाने सेवा केल्याने ८ वर्षांपासून कानाच्या पडद्याला असणारे छिद्र बरे होणे

सौ. शालिनी सुरेश

‘मागील ८ वर्षांपासून माझ्या कानाच्या पडद्याला छिद्र होते. आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी गेल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यात पू झाला असल्याने आता शस्त्रकर्म करावे लागेल. तपासणी करून आल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा होती. त्या वेळी ‘सर्वच गुरूंना समर्पित केले आहे’, या भावाने मी सेवा करत होते. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी गेल्यावर ते म्हणाले, ‘‘तुमच्या कानाच्या पडद्याला आता छिद्र नाही. तुमचा कान पूर्ण बरा झाला आहे.’’

२. दोन वेळा दुचाकीचा अपघात होतांना श्रीकृष्णाच्या कृपेने जीव वाचणे आणि त्या दिवसापासून मार्ग ओलांडून जात असतांना ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असा माझा भाव ठेवणे

एकदा मी आणि सौ. सुमाताई (सौ. सुमा पुथलथ) आम्ही दुचाकीवर (स्कूटरवर) बसून जात होतो. त्या वेळी बाजूने एक बस जात होती. ‘आम्ही पडणार’, असे वाटत होते; परंतु देवाच्या कृपेने बस पुढे गेल्यावर आम्ही मार्गावर पडलो. देवानेच आम्हाला वाचवले.

एकदा मार्ग (रस्ता) ओलांडत असतांना एक दुचाकी (स्कूटर) पुष्कळ वेगाने आली आणि थोडक्यात मी वाचले. आजूबाजूचे लोक भांबावून गेले होते. त्या दिवसापासून मार्ग ओलांडून जात असतांना ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असा माझा भाव ठेवते. त्याच्या कृपेनेच मी वाचले.’

श्रीकृष्ण आणि गुरुचरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शालिनी सुरेश, केरळ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक