कु. प्रार्थना महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे) हिला सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

अ. ‘सद़्‍गुरु नीलेशदादांचे (सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे) बोलणे अत्‍यंत शांत आणि मृदू आहे. ‘त्‍यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते. ‘त्‍यांच्‍या वाणीतून आनंदी फुलांचा वर्षाव होत आहे’ असे मला जाणवते.

कु. प्रार्थना पाठक

आ. जेव्‍हा मी सद़्‍गुरु दादांना पहाते, तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या प्रत्‍येक हालचालीतून चैतन्‍य आणि शांती यांची स्‍पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवते.

इ. त्‍यांचे चालणेही अत्‍यंत हळूवार असते. त्‍यांच्‍या चालण्‍यात एवढा हलकेपणा आहे की, ‘जणू ते ढगांमधूनच चालत आहेत’, असे मला वाटते.

ई. ते स्‍वतः सद़्‍गुरु आहेत; परंतु साधक जेव्‍हा त्‍यांच्‍याशी बोलतात, तेव्‍हा त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावर नम्रभाव अगदी सहज दिसतो. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे बघूनच मला अंतर्मुख व्‍हायला होते.

२. आलेल्‍या अनुभूती

२ अ. सद़्‍गुरु नीलेशदादांकडे पाहून सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होणे : एकदा मी रामनाथी आश्रमातील स्‍वागतकक्षात गेलेे होते. त्‍या वेळी स्‍वागतकक्षाजवळील एका खोलीतून सद़्‍गुरु नीलेशदादा पडदा हळूवार बाजूला करून बाहेर आले. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे पाहून मला साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन झाले. त्‍या वेळी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

२ आ. सद़्‍गुरु नीलेशदादांनी प्रीतीने पाठीवरून हात फिरवल्‍यावर ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधनेसाठी ऊर्जा देत आहेत’, असे जाणवणे : एकदा मी आश्रमातील जिना चढत होते. त्‍या वेळी मागून सद़्‍गुरु नीलेशदादा आले आणि त्‍यांनी माझ्‍या पाठीवरून अत्‍यंत प्रीतीने हात फिरवला. त्‍या वेळी ‘साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवच माझ्‍या पाठीवरून हात फिरवून मला साधनेसाठी ऊर्जा देत आहेत’, असे मला जाणवले.

‘गुरुदेवांच्‍याच अनंत कृपेमुळे मला सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांच्‍याकडून शिकता आले आणि त्‍यांचे चैतन्‍य अनुभवायला मिळाले’, त्‍याबद्दल सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आताची आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे), पुणे (२५.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक