सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी नवे जिल्हाधिकारी
सातारा, ८ जून (वार्ता.) – येथील जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांचे तडकाफडकी स्थानांतर (बदली) करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहिम हाती घेतली होती; मात्र लगेचच त्यांच्या बदलीचे आदेश आले.
सातारा जिल्हाधिकारी म्हणून रूचेश जयवंशी यांनी १ वर्षापूर्वी पदभार स्वीकारला. साधी रहाणी आणि प्रशाकीय कार्यातील गतीमानता यांमुळे त्यांनी वेगळा ठसा उमठवला. शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’, ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना’, ‘शासन आपल्या दारी’, अशा अनेक योजना त्यांची वेळेत पूर्ण केल्या. सर्वसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध असणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाली. प्रतापगडावरील अफजलखान थडग्याचे अतिक्रमण, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत दर्ग्याचे अतिक्रमण हटवतांना अत्यंत कुशलतेने नियोजन केल्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.
दक्ष नागरिकांची रस्त्यावर उतरण्याची चेतावणीजिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेचा कार्यकुशलेने उपयोग करून घेत जिल्ह्यातील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हातात घेतली. यामध्ये अनधिकृत बांधकामे, टपर्या, शासकीय जागेतील अनधिकृत थडगे, दर्गे आदींचा समावेश आहे, तसेच प्रशासकीय योजना सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. त्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे दक्ष नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी दिली आहे. |
संपादकीय भूमिकाअनधिकृत बांधकामे पाडणार्या जिल्हाधिकार्यांचे अचानक होणारे स्थानांतर न रोखल्यास अधिकार्यांचे खच्चीकरण होईल ! |