‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. या वेळी शिबिरात ‘वैकुंठ’ आणि ‘रामनाथी’ या शब्दांचा जप केल्यावर साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करून घेण्यात आला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘वैकुंठ’ या शब्दाचा जप करणे
जप करतांना मला शरिरात कंपने जाणवली आणि जांभया आल्या.
२. ‘रामनाथी’ या शब्दाचा जप करणे
अ. माझा चेहरा ताणल्यासारखा झाला. मला पुष्कळ जांभया आल्या.
आ. माझ्या पूर्ण शरिरावर रोमांच आले.
इ. मला पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.’
– वैद्य भूपेश शर्मा (एम्.डी. आयुर्वेद), मथुरा, उत्तरप्रदेश. (३०.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |