पाकिस्तानात गेल्या एका वर्षात १२४ अल्पसंख्यांक मुलींवर अत्याचार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर आणि अल्पसंख्यांकांच्या विरोधात अत्याचार यांची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मे मासाच्या आरंभी सिंध प्रांतातील एका ५५ वर्षीय मुसलमानाने एका ९ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि तिच्याशी विवाह केला. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायांचे संरक्षण करण्याचे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. (अशा आवाहनाचा पाकवर कधी परिणाम होईल का ? यासाठी आता सरकारने पाकला समजेल अशा भाषेत त्याला सांगितले पाहिजे ! – संपादक)
55 साल के शख्स ने 9 साल की बच्ची का किया अपहरण, इस्लामी धर्मांतरण करा के कर लिया निकाह: पाकिस्तान में 1 साल में 124 अल्पसंख्यक लड़कियों पर जुल्म#Pakistan #Nikah #Conversionhttps://t.co/nWM2qQXkoS
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 30, 2023
भारतीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात पाकिस्तानच्या अल्पसंख्यांक समुदायांतील मुली आणि महिला यांचे बलपूर्वक धर्मांतर अन् विवाह यांची १२४ हून अधिक प्रकरणे समोर आली होती. गेल्या वर्षाच्या शेवटी सिंधमधील ४४ वर्षीय हिंदु महिलेची हत्या करण्यात आली होती. तिचे शरीर छिन्न-विच्छिन्न अवस्थेत सापडले होते. पाकच्या सुक्कुरमध्ये अपहरण करणार्यांना विरोध करणार्या एका १८ वर्षीय मुलीला ठार मारण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाहिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद ! |