बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
पूर्व चंपारण (बिहार) – बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात पोलिसांनी एका ‘लव्ह जिहाद्या’ला अटक केली आहे. हा ‘लव्ह जिहादी’ दोन बनावट नावे धारण करून आणि ‘पत्रकार’ असल्याचे खोटे सांगून हिंदु महिलांना फसवत होता. तो कधी ‘निशांत राज’, तर कधी ‘निशांत रेझा’ असे नाव धारण करत होता. तो स्वत:ला ‘ब्राह्मण’ म्हणवून घेत होता. नोकरीचे आमीष दाखवून तो हिंदु महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करत होता. या ‘लव्ह जिहाद्या’कडून दोन वेगवेगळ्या नावांचे आधारकार्ड, पॅनकार्ड यांसह अनेक बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Bihar: Nishant Raza poses as Brahmin, possesses fake IDs and character certificates, blackmails two Hindu women, arrested
https://t.co/5ntbPGLbeQ— OpIndia.com (@OpIndia_com) May 30, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला निशांत राज आणि ब्राह्मण सांगून चटौनी परिसरात एक घर भाड्याने घेतले. घरमालकाच्या घरातील दोन विधवा महिलांना नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या महिलांच्या घरावर कब्जा मिळवण्याचाही तो प्रयत्न करत होता. पीडित महिलांनी घरातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. यानंतर आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यालाा कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकादेशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी समस्त हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे ! |