मंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदु एकता शोभायात्रेला ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा विरोध !

शोभायात्रेच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेची मागणी !

हिंदु जनजागृती समितीने लावलेले पोस्टर (फोटो क्रेडिट: twitter/@keypadGuerilla) (चित्रावर क्लिक करा)

मंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित हिंदु एकता शोभायात्रेला सरकारने बंदी घातलेली जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एस्.डी.पी.आय.ने) विरोध दर्शवला आहे. तसेच आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. (निष्पाप लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांच्या अटकेची मागणी करणे, हा गुन्हा नाही का ? यासाठी अशांनाच खरे तर अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)

एस्.डी.पी.आय.चे दक्षिण कन्नड जिल्हाध्यक्ष अन्वर सादत बजतूर

सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २७ मे या दिवशी दुपारी ४ वाजता बाल्मठ ज्यूस जंक्शन मार्ग येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या शोभायात्रेविषयी एस्.डी.पी.आय.चे दक्षिण कन्नड जिल्हाध्यक्ष अन्वर सादत बजतूर यांनी ट्वीट करून ते राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना ‘टॅग’ (सूचित करणे) करत म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष भारतात एका धर्मापुरते मर्यादित राष्ट्र ही संकल्पना असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, म्हणजे देशद्रोहाचे कृत्य आहे. (हिंदु राष्ट्राच्या सूत्राला भारतविरोधी ठरवणारे आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) हा कार्यक्रम बंद करण्यासमवेत आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून अटक करावी.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचे सरकार आल्यामुळे मुसलमानांचा पक्ष असणार्‍या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’कडून हा विरोध होणे आश्‍चर्यकारक नाही !