मूळ स्थिती बलपूर्वक पालटू पहाणार्‍या एकतर्फी कृतींना आमचा तीव्र विरोध !

‘क्वाड देशांकडून चीनवर टीका !

(‘क्वाड’ म्हणजे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांची संघटना)

हिरोशिमा (जपान) – भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे ४ देश सहभागी असलेल्या ‘क्वाड’ संघटनेची येथे परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज उपस्थित होते. सहभागी देशांनी चीनच्या कुरघोड्यांवर टीका केली आहे. ‘आमचा मूळ स्थिती बलपूर्वक पालटू  पहाणार्‍या अस्थिर किंवा एकतर्फी कृतींना तीव्र विरोध आहे’, असे या देशांनी संयुक्तपणे प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही वादग्रस्त भागांतील सैनिकीकरण, तटरक्षक आणि सागरी नौकांचा धोकादायक वापर अन् इतर देशांच्या कर्तव्यांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न, यांविषयी गंभीर चिंता व्यक्त करतो.