अंबाला (हरियाणा) येथे सापडले चिनी बनावटीचे ४ हँड ग्रेनेड !

अंबाला (हरियाणा) – येथील सौंतली गावामधील झुडपांमध्ये ४ हँड ग्रेनेड सापडले आहेत. हे हँड ग्रेनेड चीननिर्मित आहेत.

(सौजन्य : HARYANA 24 UPDATE) 

त्यांच्यावर असलेल्या क्रमांकांवरून पाकिस्तानातून ते आले असल्याचे म्हटले जात आहे. पाकच्या सैन्याकडून अशा प्रकारच्या हँड ग्रेनेडचा वापर केला जातो. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी अशा हँड ग्रेनेडचा वापर करत असतात, असे यापूर्वी लक्षात आले आहे.