तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

मल्‍टिप्‍लेक्‍स चित्रपटगृहांच्‍या संघटनांचा निर्णय !

चेन्‍नई (तमिळनाडू) – तमिळनाडू मल्‍टिप्‍लेक्‍स असोसिएशनने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्‍यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्‍हटले आहे.

तमिळनाडूतील अनेक राजकीय संघटनांनीही ‘हा चित्रपट कोणत्‍याही चित्रपटगृहात दाखवल्‍यास तो बंद करण्‍यात येईल’, अशी धमकी दिली आहे.

या चित्रपटावर बंदी घालण्‍याची मागणीही तमिळनाडूतील द्रविड मुन्‍नेत्र कळघम्‌ने (द्रविड प्रगती संघाने) सरकारकडे केली गेली होती. दुसरीकडे या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशात गेल्‍या ३ दिवसांत या चित्रपटाने २० कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले आहे.

संपादकीय भूमिका

  • ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्‍यंत्र उघड करणार्‍या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्‍या मूलभूत स्‍वातंत्र्याच्‍या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करणे आवश्‍यक आहे !

  • हिंदुद्वेषी आणि मुसलमानप्रेमी द्रमुक सरकारच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय होणार ?