देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

‘१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती खाली दिल्या आहेत.

‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ करण्यामागील उद्देश

या यागाची प्रधान देवता शिव आहे. शिव लयाशी संबंधित देवता आहे. येणार्‍या भीषण आपत्काळात नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोग इत्यादींमुळे अनेक प्रकारची जीवितहानी होईल. अशा वेळी सर्वत्रच्या साधकांच्या रक्षणासाठी आणि सनातनच्या सर्व आश्रमाभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी महर्षींनी हा याग सांगितला होता.

१. याग चालू असतांना

श्री. प्रशांत हरिहर

अ. ‘ऑनलाईन’ याग पहात असूनही ‘मी प्रत्यक्ष देवद आश्रमात याग चालू असलेल्या स्थळी आहे’, असे मला जाणवत होते.

आ. मी मंगळूरू येथे बसून याग पहात होतो, तरीही मला काही वेळ यागाची उष्णता जाणवत होती आणि धुपाचा सुगंध येत होता.

इ. ‘याग देवद (पनवेल) येथे होत नसून तो प्राचीन काळातील महर्षींच्या आश्रमात होत आहे आणि त्यामध्ये मीसुद्धा सहभागी झालो आहे’, असे मला जाणवले.

ई. याग चालू असतांना ‘माझ्यातील स्वभावदोष, अहं आणि त्रासदायक शक्तीचे आवरण यांची आहुती पडत आहे’, असे मला जाणवले.

२. याग झाल्यानंतर

माझे शरीर पुष्कळ हलके वाटत होते. मला समोरच्या वस्तू अधिक प्रकाशमान दिसत होत्या.’

– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (१८.३.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक