अंतःपटधारणविधी चालू असतांना शास्त्रात दिलेली मंगलाष्टके म्हणतात.
महत्त्व
‘मंगलाष्टकातून विविध देवतांना आवाहन करून त्यांना विवाहस्थळी मंत्रोच्चारातील सुमधुर नादाने आकृष्ट करून चैतन्याच्या स्तरावर वधू-वरांना आशीर्वादात्मक बळ प्राप्त करून दिले जाते. या नादाने अष्टदिशा भारित होतात आणि ज्या वेळी ऊर्ध्वदिशेकडून ईश्वरी चैतन्याचा स्रोत भूमंडलावर अवतरतो, त्या वेळी ऊर्ध्व आणि अधो या दिशा चैतन्याने भारित होेतात. अशा प्रकारे मंगलाष्टकातून प्रक्षेपित होणार्या आणि तेजधारणेने नटलेल्या मंत्रशक्तीरूपी नादाकडे आकृष्ट होणार्या चैतन्याने संपूर्ण वायूमंडल शुद्ध होऊन भारून जाते.’
मंगलाष्टकांच्या संदर्भातील अपप्रकार टाळा !
१. आधुनिक कवींनी रचलेली चैतन्यहीन मंगलाष्टके म्हणण्यापेक्षा शास्त्रात दिलेली मंगलाष्टके म्हणावीत.
२. मंगलाष्टके चित्रपटगीतांच्या चालींवर, चढाओढ करीत आणि बेसूर न म्हणता भावपूर्ण म्हणावीत.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, १३.४.२००७, दुपारी ३.२५