उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी श्रीराम मंदिरात जाऊन केली पूजा !

काँग्रेस नेते सिद्धरामय्या (डावीकडे) यांनी मंदिरात जाऊन केली पूजा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि वरुणा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सिद्धरामय्या यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी येथील चामुंडी टेकडीवर जाऊन प्रार्थना केली. त्याचप्रमाणे त्यांनी ट्वीट करून ‘मी माझ्या जन्मगावी असलेल्या सिद्धरामेश्‍वर मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले’, अशी माहिती दिली. यावरून काही ट्विटर वापरकर्त्यांनी टीकाही केली आहे. एकाने म्हटले, ‘देवावरील विश्‍वास हा मूर्खपणा’, असे म्हणणार्‍यांना आता श्रीराम तारणहार वाटत आहे.’

 (सौजन्य : India Today) 

प्रशांत नावाच्या वापरकर्त्याने ट्वीट करत म्हटले, ‘तुम्ही देव, अंधश्रद्धा, कपाळावर कुंकू वगैरे विषयी बोलत होता. हे सर्व तुम्हाला चालत नाही ना ? मग आता कशाला मंदिरात गेलात ?’

संपादकीय भूमिका

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतो, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !