‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाजवळील एका बंगल्यासमोर एक पपईचे झाड आहे. मागील ६ मासांपासून मी त्या पपईच्या झाडाचे निरीक्षण करत आहे. ते झाड साधारण ५ फूट उंच होते. त्याला भरपूर पाने आणि २ – ३ पपयाही लागल्या होत्या. एकदा त्या झाडाकडे माकडांचे लक्ष गेले आणि त्यांनी झाडाची पाने अन् पपया खाऊन झाड उद्ध्वस्त केले. त्यानंतर काही दिवसांनी त्या झाडाला पुन्हा एक फांदी आली आणि तिलाही हिरवी पाने आली. माकडांनी झाडाची पाने पुन्हा खाल्ली आणि फांदी मोडून टाकली.
एवढे आघात होऊनही त्या झाडाला परत पालवी फुटली आहे. यातून मला शिकायला मिळाले की, माणसासारखा बुद्धीमान प्राणी एका आघाताने कासावीस होतो आणि धीर सोडतो; पण ईश्वरनिर्मित झाड कितीही आघात झाले, तरी अन् जगण्याचा प्रयत्न करते आणि निर्मितीचे प्रयत्न सोडत नाही.’
– श्री. प्रकाश रा. मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२६.११.२०२२)