‘कारागृहातून सुटू दे; मग पोलिसांना दाखवतो !’

गुंड अतिक अहमद याची त्याच्या मुलाला चकमकीत ठार मारणार्‍या पोलिसांना कारागृहातून धमकी !

गुंड अतिक अहमद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड अतिक अहमद यांचा तिसर्‍या क्रमांकाचा १९ वर्षीय मुलगा असद याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने चकमकीत ठार मारल्यानंतर अतिक याने पोलिसांना धमकी दिल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीनीने प्रसारित केले आहे. ‘मला कारागृहातून सुटू दे, मग ज्या पोलीस अधिकार्‍यांनी असदला मारले, त्यांना दाखवीन खुर्ची काय असते ?’, अशा शब्दांत धमकी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी अतिक याला जेव्हा असद याला ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, तेव्हा तो न्यायालयात होता. तेथेच तो भूमीवर बसून रडू लागला होता.

सौजन्य: TIMES NOW Navbharat

संपादकीय भूमिका

जन्मठेपेची शिक्षा होऊनही गुन्हेगारी वृत्ती नष्ट होत नाही, हे लक्षात घेता अशा गुंडांना जन्मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे, असे कुणालाही वाटेल !

  • मुलाला शेवटचे पाहू न दिल्याने अतिक अहमदचा थयथयाट  

  • (म्हणे) ‘अल्ला तुम्हाला क्षमा करणार नाही !’

असद याचा मृतदेह १५ एप्रिल या दिवशी प्रयागराज येथे पुरण्यात आला. या वेळी त्याचे आजोबा आणि अन्य नातेवाइक उपस्थित होते. सर्वांची ओळखपत्रे तपासून त्यांना कब्रस्तानात प्रवेश देण्यात आला. सर्वांची माहिती घेण्यात आणि छायाचित्रे काढण्यात आली. या वेळी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे लक्ष ठेवण्यात येत होते. अतिक यालाही येथे उपस्थित रहायचे होते. त्याला अनुमती न दिल्याने तो संतप्त झाला. त्याने म्हटले, ‘मला माझ्या मुलाला एकदा पाहू द्या. टीव्ही किंवा मोबोईलद्वारे त्याला शेवटचे पाहू द्या. मुलाला पहायला मिळणे, हा माझा अधिकार आहे. अल्ला सर्व पहात आहे. अल्ला तुम्हाला क्षमा करणार नाही. तुम्ही माझ्या कुटुंबाला संपवत आहात’, अशा प्रकारची विधाने केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’वर दाखवण्यात आले.

सौजन्य: Zee News

संपादकीय भूमिका

ज्या लोकांना अतिकने ठार मारले, ज्यांच्या संपत्तीची लूट केली, त्या लोकांचे अतिक याला तळतळाट लागल्याने आज त्याची ही स्थिती झाली आहे. गुंडांना अशीच शिक्षा सर्वत्र मिळू लागल्यास गुन्हे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !