जपानचे पंतप्रधान बाँबस्फोटातून बचावले !

आक्रमणकर्त्याला अटक

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (डावीकडे)

टोकीयो (जपान) – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे १५ एप्रिलला एका बाँबस्फोटातून बचावले. ते वाकायाम शहरात एका सभेला संबोधित करण्यास गेले असते तेथे बाँबस्फोट घडवण्यात आला. स्फोटाच्या आवाजाने उपस्थित लोक सैरावैरा पळू लागले. त्या वेळी सुरक्षादलांनी पंतप्रधान किशिदा यांना तेथून सुखरूप बाहेर काढले. पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना घटनास्थळीच अटक केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ८ जुलै २०२२ या दिवशी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका सभेमध्ये भाषण करतांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.