गुलाम याच्या आईकडून पोलीस चकमकीचे समर्थन : मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार !

असदसमवेत पोलीस चकमकीत ठार झालेला गुंड गुलाम याच्या आईचा व्हिडिओ प्रसारित !

ठार झालेला गुंड गुलाम (डावीकडे) आई खुशनुदा व भाऊ राहिल (उजवीकडे)

प्रयागराज – उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुंड गुलाम हे दोघे नुकतेच पोलीस चकमकीत ठार झाले. याविषयी प्रयागराज येथे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना गुलाम याची आई खुशनुदा यांनी सांगितले की, उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने काहीच चुकीचे केलेले नाही. चुकीच्या कृतीचा परिणाम वाईटच होतो. गुलामच्या आईने मृतदेह स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. गुलामचे तोंडही पहाण्याची माझी इच्छ नाही, असे त्या म्हणाल्या.

सौजन्य: Tapo Bharat

गुलामचा भाऊ राहिल यानेही चकमकीचे समर्थन केले आहे. राहिलने सांगितले की, गुलामने अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे. गुलामच्या अंत्यविधीलाही मी उपस्थित रहाणार नाही.