जगातील पहिल्या व्यसनमुक्त कुत्र्याविषयी माहिती वाचा एका क्लिकवर …  

व्यसनमुक्त झालेला जगातील पहिला श्‍वान ‘कोको’

नवी देहली – ‘न्यूजवीक’ या नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार एक पाळीव श्‍वान दारूच्या आहारी गेला होता आणि दारूच्या व्यसनावर उपचार करून तो व्यसनमुक्त झालेला जगातील पहिला श्‍वान बनला आहे. ‘प्राणी कल्याण चॅरिटी’च्या फेसबुक पानावर याची माहिती देण्यात आली आहे.

सौजन्य: Aaj Ki Khabar | आज की ख़बर

‘कोको’ नावाच्या २ वर्षांच्या लॅब्राडोर जातीच्या श्‍वानाचा मालक दारूच्या  आहारी गेला होता. मालक दारू पिऊन झोपी गेल्यानंतर त्याच्या ग्लासमध्ये शिल्लक राहिलेली दारू कोको पित असे. त्याला दारूचे व्यसन लागले. मालकाच्या मृत्यूनंतर कोको आणि अन्य एक श्‍वान या दोघांना ब्रिटनजवळील डेव्हन येथील वुडसाई अ‍ॅनिमल रेस्क्यू ट्रस्टकडे सोपवण्यात आले. अती मध्यप्राशनामुळे ते गंभीरपणे आजारी होते. उपचाराच्या वेळी दुसर्‍या श्‍वानाचा मृत्यू झाला, तर कोकोला उपचाराच्या वेळी त्याला फिट्स (आकडी) येऊ लागले. त्याला धोक्यातून बाहेर काढण्यासाठी ४ आठवडे बेशुद्ध ठेवावे लागले. आता कोको बरा होत असून तो सामान्य श्‍वानाप्रमाणे वागू लागला आहे.

संपादकीय भूमिका

‘आता माणसांनी श्‍वानांकडून शिकावे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !