स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागावतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील ! त्यामुळे मनात तिच्याविषयी सहानुभूती ठेवून तिला दोष निर्मूलन करण्यासाठी साहाय्य करावे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०२१)