१. ‘सनातन प्रभात’मधील धर्मजागृतीच्या बातम्या आम्ही ‘व्हॉट्सॲप’वर पाठवतो ! – विनोद पाटील
आमच्याकडे जवळपास २ मासांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ येते. त्यातून हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी केलेली जागृती लक्षात येते, तसेच हिंदु सण, उत्सव यांविषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळते. धर्मजागृतीविषयीच्या बातम्या आम्ही ‘व्हॉट्सॲप’च्या गटात पाठवतो.
२. मी धर्मकार्याच्या सेवेसाठी वेळ देईन ! – ज्ञानेश्वर पाटील
मी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचतो आणि इतरांनाही वाचायला देतो. मी इतरांनाही दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्यासाठी सांगत असतो. धर्माविषयीची जागृती दैनिक ‘सनातन प्रभात’ निर्माण करत आहे. हे दैनिक चालू केल्यामुळे दैनिकासाठी येणारा खर्च, कागद, छपाई यांचा खर्च यांसाठी एक प्रकारे साहाय्य होईल. सेवा असेल, तर मला सांगत जा. मासातून एक दिवस मी सेवेला येत जाईन. धर्मकार्यासाठी माझ्या परीने जे काम करता येईल, ते करीन.
३. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ अनेकांना चालू करण्यासाठी प्रोत्साहित करतो. – श्री. किशोर संचेती, पाचोरा
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ पुष्कळ चांगले आहे. ते अधिकाधिक घरांपर्यंत पोचले पाहिजे. – बनोटीवाला ज्वेलर्स, पाचोरा