गोव्यात १७ एप्रिलपासून जी-२० च्या ८ बैठका होणार

(जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर यांचा एक गट आहे.) 

गोव्यात जी-२० च्या ८ बैठका

पणजी – गोव्यात १७ ते १९ एप्रिल या कालावधीत ग्रँड हयात, बांबोळी येथे होणार्‍या पहिल्या बैठकीनंतर मे मासात २, जूनमध्ये ४ आणि जुलैमध्ये १ अशा ७ बैठका ‘ताज’ हॉटेलमध्ये होणार आहेत. प्रत्येक बैठकीला सुमारे २५-२६ देशांतील ३०० ते ४०० प्रतिनिधी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

गोव्यातील जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीला २ आठवड्यांहून अल्प कालावधी शिल्लक असतांना प्रतिनिधींसाठी सुविधा आणि कडेकोट सुरक्षा यांवर जोर देण्यात आला आहे. वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’पासून ते प्रतिनिधींसाठी वैद्यकीय सुविधा, २४ घंटे हॉटलाईनची उपलब्धता, ३० खाटांची दर्जात्मक सुविधा आणि कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यास उपाय आदी सिद्धतेसह आरोग्य विभागाने दावा केला आहे की, ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.