(म्हणे) ‘मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे !’ – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे ब्राह्मणद्वेषी विधान !

छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज सौ. संयोगिताराजे भोसले आणि पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा – काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज सौ. संयोगिताराजे भोसले यांच्या समवेत घडलेल्या प्रकाराचा मराठा सेवा संघ निषेध करत आहे. आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे. ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी, असे वक्तव्य संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. (मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असतांना अशा स्वरूपाचे वक्तव्य करून जातीयद्वेषी पुरुषोत्तम खेडेकर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे दुष्कृत्य करत आहेत ! – संपादक)

 (सौजन्य : ABP MAJHA)

‘सर्व मंदिरे भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करा’, असे त्यांनी म्हटले. (मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे बोलणारे खेडेकर चर्च आणि मशिदी यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे सूत्र का उपस्थित करत नाहीत ? – संपादक) ‘देवस्थानांचा पैसा गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरावा. मंदिरे भटमुक्त करण्यासाठी पुढील काळात राज्यात तीव्र आंदोलन करू’, असेही ते म्हणाले. (देवस्थानांचा पैसा गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन करणारे खेडेकर महाशय हेच आवाहन अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमधील पैशांविषयी करण्याचे धाडस दाखवतील का ? – संपादक)