रिझर्व्ह बँकेकडून ६ सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई !      

पुणे – रिझर्व्ह बँकेने ६ सहकारी अधिकोषांवर नियमभंग केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. या अधिकोषांना १ लाख १० सहस्र रुपये ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवीतील ‘श्री गणेश सहकारी बँक’, तर सोलापुरातील ‘व्यापारी सहकारी बँक मर्यादित’ या अधिकोषांचा समावेश आहे. या अधिकोषांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड केला आहे. बँकिंग नियमन कायदा १९५० चे उल्लंघन आणि ठेवींवरील व्याजदराशी निगडित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.