वर्ष २०३० पर्यंत २ ट्रिलियन डॉलरच्या (१६४ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या) निर्यातीचे ध्येय !

नवीन परराष्ट्र व्यापार नीती २०२३ ची घोषणा !

नवी देहली – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी नव्या परराष्ट्र व्यापार नीती २०२३ ची ३१ मार्च या दिवशी घोषणा केली. यांतर्गत वर्ष २०३० पर्यंत भारताचे उत्पादन आणि सेवा यांची २ ट्रिलियन डॉलरपर्यंत (१६४ लाख कोटी रुपयांपर्यंत) निर्यात करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. १ एप्रिल २०२३ पासून या योजनेला आरंभ होईल. सरकार अनेक देशांपर्यंत पोचून व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी झपाट्याने प्रयत्नशील असेल. परराष्ट्र मंत्रालयानेही व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांच्या वृद्धीसाठी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे प्रमुख संतोष सारंगी यांनी सांगितले की, येत्या आर्थिक वर्षात ७६० बिलियन डॉलरची (६२ लाख कोटी रुपयांचा) आयात करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात हा आकडा ६७६ बिलियन डॉलरचा (५५ लाख कोटी रुपयांचा) होता.