कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे पुणे-नाशिक महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन

पुणे – कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी तळपत्या उन्हात पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरत २९ मार्च या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले होते. चाकण औद्योगिक क्षेत्रातील बाजार समितीत अचानक बाजारभाव पडल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.

कांद्याला ५ ते ८ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप होता. या वेळी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांद्याचा पुन्हा लिलाव करावा, तसेच तहसीलदारांनी आंदोलकांना शब्द देण्यासाठी यावे, अशी मागणी करण्यात आली.