माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे वाईट परिणाम !

सामाजिक माध्यमांच्या विरोधात अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेची याचिका

San Mateo County School Boards Association

वाशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘सॅन मॅटो काऊंटी बोर्ड ऑफ एज्युकेशन’ या शैक्षणिक संस्थेकडून सामाजिक माध्यमे फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक टॉक, तसेच गूगल आणि स्नॅप चॅट यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

या माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे, असा दावा यात करण्यात आला आहे. ‘मुले सतत या माध्यमांशी जोडलेले रहातात आणि त्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होतो’, असे यात म्हटले आहे.

या संदर्भात फेसबुकचे आस्थापन ‘मेटा’चे अधिकारी अँटिगोन डेविस यांनी सांगितले की, जेव्हा विद्यार्थी इन्स्टाग्रामशी जोडले जातात, तेव्हा आम्ही स्वयंचलित स्तरावर त्यांचे खाते खासगी करतो आणि त्यांना काही कालावधीने खाते पहाण्यासाठी परावृत्त होण्यासाठी संदेश पाठवत रहातो. तसेच आत्महत्या किंवा हानी पोचवणारी साम्रगी पहाण्याचीही आम्ही अनुमती देत नाही. त्यांच्याकडून अशा प्रकारची सामग्री प्रसारित केली जात असेल, तर आम्ही ती लगेच हटवतो.

संपादकीय भूमिका

सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांविषयी जनतेत जागृती होणे आवश्यक आहे, असेच ही घटना दर्शवते !