समाजवादी पक्षाचे आमदार स्वामी ओमवेश ईदला मुसलमानांवर हेलिकॉप्टरने करणार फुलांचा वर्षाव !

समाजवादी पक्षाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री स्वामी ओमवेश

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील बिजनौरमधील चंदपूरचे समाजवादी पक्षाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री स्वामी ओमवेश हे ईदच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून मुसलमानांवर फुलांचा वर्षाव करणार आहेत. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून ईदनिमित्त हेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव करण्यासाठी अनुमती देण्याची विनंती केली आहे. ‘ईदच्या पवित्र सणानिमित्त मुसलमान बांधवांचे स्वागत, आदर आणि शुभेच्छा देण्यासाठी मी अनुमती मागितली आहे. या चांगल्या कामासाठी जिल्हा प्रशासन मला अनुमती देईल’, अशी आशा स्वामी ओमवेश यांनी व्यक्त केली. स्वामी ओमवेश यांनी, ‘मी सर्व धर्मांचा आदर करणारा आहे’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !