हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अकोला जिल्हाधिकार्यांना निवेदन !
अकोला – परकीय आक्रमक आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या मोगलांचे उदात्तीकरण करणार्या ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ या ‘वेब सिरीज’वर तात्काळ बंदी घालावी, यासाठीची मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे २५ मार्च या दिवशी करण्यात आली.
समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणार्या या ‘वेब सिरीज’चे निर्माते, मोगलांचे समर्थन करणारे कलाकार यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, या संदर्भात अकोला येथील जिल्हाधिकार्यांना हिंदु जनजागृती समिती, तसेच विविध संघटना यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने संजय खडसे त्यांनी निवेदन स्वीकारले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्या श्रुती भट, सनातन संस्थेचे श्री. अजय खोत, संजय ठाकूर, चंदनसिंह ठाकूर, ‘क्षत्रिय समाज, अकोला’चे पृथ्वीराजसिंह ठाकूर, विजय सिंह, राजेंद्रसिंह ठाकूर, श्री. दीपक पाटणे हे धर्माभिमानी या वेळी उपस्थित होते.
या संदर्भात दिलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, ३ मार्चपासून प्रारंभ झालेल्या ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेब सिरीज् ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित करण्यात येत आहे. याचे कथानक मोगल राजा अकबर आणि त्याची ३ मुले यांच्यामध्ये सत्तेसाठी झालेले युद्ध आणि क्रूरता यांवर आधारित आहे. मोगलांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराच्या इतिहास सांगणारे नव्हे, तर त्यांचा परिवार, राजकारण, व्यक्तिमत्व आदी गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही ‘वेब सिरीज’ प्रदर्शित करणे म्हणजे त्यांचेे उदात्तीकरण आहे. हिंदु धर्म नष्ट करणार्या, हिंदूंच्या वंशविच्छेदाचा प्रयत्न करणार्या मोगलांवर अशा प्रकारे ‘वेब सिरीज’ काढणे म्हणजे हिंदूंंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या पडद्याआड परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी नव्याने कायदा बनवावा’, अशी हिंदु जनजागृती समिती निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहे. |
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठांवर येऊ नये. अशा ‘वेब सिरीज’वर सरकारने स्वतःहून कारवाई करणे आवश्यक ! |