सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीनंतर ५ नक्षलवाद्यांना अटक

सुकमा (छत्तीसगड) – येथे पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीनंतर ५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

या चकमकीत ५ नक्षलवादी घायाळ झाले असल्याची शक्यता असून ते घायाळ अवस्थेतच पळून गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या येथे शोधमोहीम राबवली जात आहे.