अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !

अमृतपाल सिंह

मुंबई – कट्टर खलिस्तानवादी अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आश्रयाला आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्‍या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.