आज श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने मूकपदयात्रा !

कोल्‍हापूर – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या कोल्‍हापूर शहर विभागाच्‍या वतीने मंगळवार, २१ मार्च या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानदिनाच्‍या निमित्ताने मूकपदयात्रा काढण्‍यात येणार आहे. ही पदयात्रा सायंकाळी ६ वाजता बिंदू चौक येथून प्रारंभ होईल. तरी ज्‍यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले, त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ हिंदूंनी या मूकपदयात्रेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.